पुणे : कोंढवा भागात एका बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. बांधकाम पर्यवेक्षकाला इमारतीवरून फेकून देण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – मावळमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, श्रीरंग बारणे २२ तारखेला, तर संजोग वाघेरे २३ एप्रिलला अर्ज भरणार

हेही वाचा – पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकज कुमारमोती कश्यप (वय ३५, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) असे खून झालेल्या पर्यवेक्षकाचे नाव आहे. कोंढवा भागातील स्टर्लिंग सोसायटीच्या फेज सहा परिसरात एकजण मृतावस्थेत पडल्याची माहिती एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी ओळख पटविली. तेव्हा पंकज बांधकाम पर्यवेक्षक असल्याचे समजले. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचे उघडकीस आले. पंकज याच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.