शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये करोना काळजी केंद्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सध्या दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता जुलैअखेर शहरात २० हजार रुग्ण असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने महापालिके ने तयारी सुरू के ली आहे. त्यानुसार कृषी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये करोना काळजी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

करोनाच्या सद्य:स्थितीबाबत दूरचित्रसंवादाद्वारे महापालिका आयुक्त गायकवाड यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘शहरात करण्यात येणाऱ्या चाचण्या वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.

जुलैअखेपर्यंत शहरात २० हजार रुग्ण असतील, असा पालिका प्रशासनाचा अंदाज आहे. ही शक्यता गृहीत धरून उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यानुसार करोना काळजी केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

त्याअंतर्गत कृषी महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह (सीओईपी) सात करोना काळजी

केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. कृषी महाविद्यालयात ८००, तर सीओईपीमध्ये २०० खोल्यांमधून ६०० खाटा उपलब्ध होणार आहेत. तसेच शहरातील बॅडमिंटन सभागृहे देखील करोना काळजी केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. मुंबईप्रमाणे पुण्यातही महा करोना काळजी केंद्र उभे करण्याचा प्रयत्न महापालिके कडून करण्यात येत आहे. सध्या शहरात २० करोना काळजी केंद्रे असून त्यामध्ये नव्या सात केंद्रांची भर पडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त करोना बाधितांवर उपचार करणे शक्य होणार आहे.’

दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत १४२ जणांना करोना संसर्गाची लागण झाली असून त्यातील ७० जण बरे झाले आहेत. करोना काळजी केंद्रात डॉक्टरांची उपलब्धता, पायाभूत सुविधा, इतर ठिकाणचे डॉक्टरांना या
केंद्रांमध्ये भेट देणे शक्य आहे किं वा कसे?, रसदपुरवठा यांबाबत करोना केंद्रे वाढवताना काळजी घेतली जाणार आहे, असेही आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले.

शहरी गरीब योजनेच्या व्याप्तीत वाढ

शहरी गरीब योजनेंतर्गत करोना बाधितांवर शहरात उपचार करण्यात येत आहेत. वैद्यकीय देयकांमध्ये ५० टक्के  खर्च महापालिका करत असून उर्वरित खर्च संबंधित रुग्णांना करावा लागतो. योजनेची मर्यादा प्रतिकु टुंब एक लाख रुपयांपर्यंत आहे. मात्र, सध्या एकाच कु टुंबातील तीन ते चार जण बाधित होत असल्याने या योजनेची व्याप्ती लवकरच वाढवण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाकडून नव्या करोना काळजी के ंद्रांसाठी डॉक्टरांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण होईल. याबाबत २४ तासांत आदेश प्रसृत के ले जातील, असेही महापालिका आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus possibility of 20000 patients in pune by end of july
First published on: 07-07-2020 at 00:20 IST