लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुलीच्या प्रवेशावरुन वाद झाल्याने महिलेने पतीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना येरवडा भागात मंगळवारी रात्री घडली. या घटनेत पती गंभीर जखमी झाला असून पत्नीसह नातेवाईकांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

आणखी वाचा-पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी वाहतूक राहणार बंद

मुकेश सुरेश रजपूत (वय ४२, रा. येरवडा) असे गंभीर भाजलेल्या पतीचे नाव आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पत्नी उज्वला दत्तात्रय कांबळे (वय ४४) हिला अटक करण्यात आली असून तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला मुकेशची दुसरी पत्नी आहे. दोघांना पाच वर्षांची मुलगी आहे. शाळेच्या प्रवेशावरुन दोघांमध्ये मंगळवारी रात्री वाद झाला. उज्वलाने पतीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. गंभीर जखमी झालेल्या मुकेश यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह एका नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.