पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा प्रवासी सिंगापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रवाशाचे नमुने घेण्यात आले असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना संपूर्ण जगभरासह भारतातही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चाचणी करण्यात आला असता एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे.

“चिंता करण्याची गरज नाही. गेल्या ८ ते १० दिवसांपासून आपण विदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे,” अशी माहिती पुणे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली आहे.

IndiGo flights delayed after system crashes
पुणे विमानतळावर प्रवाशांचे हाल संपेनात! इंडिगोच्या यंत्रणेतील बिघाडाने उड्डाणाला तीन तासांचा विलंब
pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

चीनमधील करोनाच्या उद्रेकामुळे भारत सावध; नमुन्यांचे ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ वाढविण्याची केंद्राची राज्यांना सूचना

पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितलं की “ती ३२ वर्षीय महिला आहे. त्यांना कोणतंही लक्षण जाणवत नाही आहे. त्यांना सध्या घऱातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे”.

करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देताना ते म्हणाले की “एकूण २० ठिकाणी आपण लसीकरण सुरु केलं आहे. ९० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. पण बूस्टर डोस न घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना आम्ही या लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेण्यासाठी आवाहन करत आहोत. तसंच गेली २ वर्ष जी काळजी आपण घेतली तेच नियम पाळावेत असं आवाहन आहे”.