पिंपरी चिंचवड: अहमदाबाद विमान अपघातात अडीचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात पिंपरी – चिंचवड मधील इरफान शेख याचा देखील समावेश आहे. दीड ते दोन वर्षांपासून क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या इरफानचे लंडनच्या दिशेने विमान झेपवण्याआधी आईशी बोलणं झालं होतं. परंतु, काही तासातच लंडनला निघालेलं विमान अपघातग्रस्त झाल्याचं त्याच्या आईला समजलं यानंतर अवघ शेख कुटुंब तो सुखरूप असावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत होते.
रात्री उशिरा या विमान अपघातात इरफानचा देखील मृत्यू झाल्याचं समजलं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच इरफान ची आई, वडील आणि भाऊ हे अहमदाबादला गेले आहेत. डीएनए टेस्ट केल्यानंतरच इरफान चा मृत्यू त्यांना मिळण्याची शक्यता आहे. इरफान हा मनमिळावू होता. इरफान शेख चा हा पहिलाच आणि अखेरचा जॉब राहिला.
इरफान ला नेहमी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला आवडायचं, तो नेहमी म्हणायचा माझ्या आई- वडिलांना मी फिरायला घेऊन जाणार ही त्याची इच्छा अपुर्णच राहिली. बकरी ईद च्या निमित्ताने इरफान पिंपरी- चिंचवड मध्ये आला होता. कुटुंबासोबत त्याने ईद साजरी केली होती. परंतु, तो पुन्हा कधीच परत येणार नाही, अस कुणालाही वाटलं नव्हतं. प्रत्येक वेळी इरफान कुठलं ही विमान उड्डाण घेण्याआधी तो आईशी फोनद्वारे बोलायचा. काल तो काही मिनिटे आधी आई शी बोलला. इरफानचे आई वर खूप प्रेम होतं, अस त्याच्या काकांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.