एका महिलेवर वेश्या व्यवसाय करत असल्याचा आरोप करुन खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांच्याविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धनकवडी भागात ही घटना घडली.या प्रकरणी सीमा शशिकांत शिंदे (वय ३०), तिचा मित्र, अर्चना नायडू यांच्यासह दहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>पुणे: नागरी सेवा संयुक्त परीक्षा २०२३ द्वारे ६७३ पदांची भरती प्रक्रिया; ४ जूनला ३७ जिल्हा केंद्रावर पूर्व परीक्षा

police constable suspended for helping drug smuggler
अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

अर्चना नायडू आणि फिर्यादी महिला शेजारी आहेत.फिर्यादी महिला सदनिकेत वेश्याव्यवसाय चालवित असल्याचा आरोप नायडूने केला होता. त्यानंतर नायडू, तिचा मित्र आणि साथीदार महिलेच्या सदनिकेत शिरले. पत्रकार असल्याची बतावणी केली. आमच्याबरोबर पोलीस असल्याची बतावणी त्यांनी महिलेकडे केली होती. हे प्रकरण त्वरित मिटवण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून त्यांनी महिला, तिचा मुलगा आणि भाचीला मारहाण केली. महिलेकडून १९ हजार रुपये, ७० हजारांचे सोन्याचे दागिने घेतले. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.