विकेंड असल्याने लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट येथे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यानंतर, भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याची बातमी पसरताच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाली. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे धुक्याची चादर पसरली त्याचा आल्हाददायी अनुभव पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह अनुभवला आहे.

सहयाद्रीच्या डोंगर दरीतून धबधबे वाहू लागले आहेत –

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे. आज रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली. मक्याचं कणीस, कांदा भजी, चीज भजी, स्वीट कॉर्न चा आस्वाद पर्यटक घेत होते. अगदी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. सहयाद्रीच्या डोंगर दरीतून धबधबे वाहू लागले आहेत. भुशी धरणावर गर्दी असल्याने अनेक पर्यटक छोट्या छोट्या धबधब्याखाली भिजत वर्षाविहाराचा ममसोक्त आनंद घेतला.

PHOTOS : वर्षा विहाराचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन वर्षे झाली करोनामुळं पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी होती. घरात बसून नागरिक कंटाळले होते. त्यामुळं यावर्षीचा पावसाळा हा पर्यटकांसाठी विशेष असल्याचं पर्यटकांनी सांगितलं आहे. अनेक तरुण पर्यटक मद्यपान करून लोणावळा, भुशी डॅम, टायगर पॉइण्ट, लायन्स पॉईंट इथे येतात त्यांच्यावर लोणावळा पोलिसांनी लक्ष ठेवत कारवाई करायला हवी.