पिंपरी-चिंचवड शहरात ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला असून यादरम्यान तब्बल १२० झाडं उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंगळवार आणि बुधवार अशा दोन्ही दिवसात अनेक झाडं मुळासह उन्मळून पडली होती. या घटनांमध्ये कोणतीही जीविहितहानी झाली नाही. अशा संकटाच्या काळात पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे जवान या नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपलं कर्तव्य बजावत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. यात सार्वजनिक आणि वैयक्तिक मालमत्तासंह निसर्गाचंही मोठं नुकसानं झालं. शहरातील पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, प्राधिकरण, भोसरी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी यासह इतर भागात झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. मंगळवारी पावसाला सुरुवात झाली. त्या अगोदर मान्सूनपूर्व वाटणारा पाऊस हा निसर्ग चक्रीवादळाची चाहूल असल्याचं समजलं. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा याचा मोठा फटका बसणार असल्याचे भाकीत हवामान विभागानं वर्तवलं होतं. तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याचे हे भाकीत तंतोतंत खरेही ठरले.

त्यानुसार, शहरात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, आज दुपारपासून शहरातील वातावरण हे निवळले असून पावसाचा जोर कमी झाला आहे. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात शहरातील वातावरण हे भयावह होते. रस्त्याच्या कडेला, घराच्या अंगणात पार्क केलेल्या मोटारी आणि दुचाकींवर मोठ-मोठी झाडं कोसळली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे या चक्रीवादळात मोठे नुकसान झाले. तर दुसरीकडे अग्निशमन दलाचे जवान या काळात मुसळधार पावसात आपलं कर्तव्य बजावताना दिसले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone hits 120 trees uprooted in pimpri chinchwad aau 85 kjp
First published on: 04-06-2020 at 19:59 IST