पिंपरी: मागच्या काळात (भाजप) थांबलेल्या विकासाला गती द्यायची आहे. गेल्या काही दिवसात शहराच्या विकासाची बिघडलेली घडी आपल्याला पुन्हा बसवायची आहे. शहराचा सर्वांगीण विकास करायचा असल्याचे सांगत शिवसेना-भाजप महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे पालिकेत भाजपची सत्ता असताना विकास थांबल्याची टीका केली.

आकुर्डी बोलताना पवार म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा नियोजनबद्ध विकास केला. सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक होता. तो आता आपल्याला परत मिळवायचा आहे. त्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. ब-याचदा विकासकामांच्या निविदा ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न केला जातो. रिंग केली जाते. किंमती वाढविल्या जातात. कारण नसताना नागरिकांचा कररुपाने आलेले पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च करण्याची अलीकडे बरीच उदाहरणे पहायला मिळतात. झोपडपट्टीमुक्त शहर करायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. मागच्या काळात (भाजपच्या) थांबलेल्या विकासाला गती द्यायची आहे. रखडलेली प्रभागातील कामांना गती दिली जाईल.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…

हेही वाचा… पुणे-दौंड रेल्वे प्रवास स्वस्तात! मार्गावर लोकल सेवा सुरु होणार

पक्षाच्या स्थापनेपासून शहरातील जनतेने मला, पक्षाला मोठी ताकद, प्रेम दिले. शहरावर माझे विशेष प्रेम आहे. त्यामुळे मला नेहमीच शहराबद्दल आपुलकी, प्रेम जिव्हाळा वाटत असतो. शहराचा विकास व्हावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न चालला असतो. १५ दिवसांपासून शहरातील कामांचा आढावा घेऊन गती देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा…

आता काहीजण अधूनमधून शहरात येत आहेत. वेगळ्या प्रकारचे वातावरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून पुतणे आमदार रोहित पवार यांना टोला लगावत अजित पवार म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर मी लक्ष घातले. कठोर निर्णय घेतले. रस्ते, पुल, पाणी योजना, शैक्षणिक सुविधा देत असताना शहराचे हित डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतले. १९९९२ पासून २०१७ पर्यंत महापालिका ताब्यात असेपर्यंत सर्वांगीण विकास कामे केली.