पुणे : कोयना धरणाचे पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्याऐवजी सातारा, सांगली जिल्ह्यांतील नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी देण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. याबाबत सामोपचाराने तोडगा काढू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.

यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी कोयनेचे पाणी शेती आणि पिण्यासाठी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सांगलीचे खासदार पाटील यांच्यात कोयनेतून सांगली जिल्ह्याला पाणी सोडण्यावरून वाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रकरणी सामोपचाराने तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही शनिवारी पुण्यात दिली.

हेही वाचा- “होय, पंकजा मुंडेंवर अन्याय झालाय”; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, “ज्यांच्या वडिलांनी…”

दरम्यान, ससून रुग्णालयातील अंमली पदार्थांच्या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, ससून रुग्णालय किंवा पोलिसांशी संबंधित कोणताही अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ससून प्रकरणी चौकशी अहवाल आल्यानंतर या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, ही महायुतीची भूमिका आहे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा- भुजबळांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका वैयक्तिक? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंमली पदार्थ तस्करांना फाशी दिली पाहिजे

तरूण पिढीला बरबाद करण्याचे काम अंमली पदार्थांची तस्करी करणारे करत आहेत. अशा प्रकरणांत कायद्यात बदल करण्याची गरज असून दोषींना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. सण, उत्सव काळात दूध, पनीर किंवा मिठाईत भेसळ करणाऱ्यांनाही कठोर शासन झाले पाहिजे. जे माणसाचा विचार न करता स्वत:च्या फायद्याचा विचार करतो, अशा लोकांची गय करता कामा नये, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.