लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून अज्ञातांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- पीएमपीचा संप मागे, सेवा पूर्ववत होण्यास प्रारंभ; पुणे, पिंपरी-चिंचवडमधील प्रवासी, विद्यार्थ्यांना दिलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजता, रुपेश मसंत मोरे, (वय २५ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. कात्रज गावठाण) दैनंदिन काम उरकून घरी जात असतानाच अज्ञात क्रमांकाच्या मोबाईलवरुन व्हॅाटस अॅप वर मेसेज आला होता. त्या मध्ये रुपेश यांचा एका मुलीसोबत विवाह झाल्याच्या नोंदणीच्या प्रमाणपत्राचे छायाचित्र होते व त्या खाली लिहिले होते. “हमने आपके नाम का मॅरेज का सर्टिफिकेट बनाया है, खराडी आयटी पार्क के सामने इनोव्हा मे २० लाख रुपये रख देना, पोलीस कम्प्लेंट किया और इनोव्हा सील हुआ तो देख लेना क्या करते है आपके साथ, और पुलीस कम्लेंट करके कुछ नही होने वाला, इम्तियाज चाचा ने पहले से सब सेटींग करा है, पुरी चंदननगर पोलीस स्टेशन मॅनेज कर दी है.” असा धमकीचा मेसेज होता. रुपेश यांनी त्याकडे ओके म्हणून दुर्लक्ष केले. त्यानंतर कोणाचा फोन व मेसेज आला नाही. मात्र त्यानंतर तुलाच पैसे देण्यासाठी यावेच लागेल असे सांगून त्या ने रुपेश ला दोन तीन दिवस वारंवार मेसेज करून त्रास दिल्या नंतर रुपेश ने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

आणखी वाचा- अन्नातून विषारी ओैषध; श्वानाच्या तीन पिलांचा मृत्यू; वारजे भागतील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीही रुपेश मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने रूपेश यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर एक चिठ्ठी ठेवण्यात आली होती. चिठ्ठीत ‘सावध रहा रूपेश’ असा मजकूर लिहण्यात आला होता. या प्रकरणाचा अद्यापही उलघडा झाला नसताना दुसऱ्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.