लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पितृपक्षानंतर पालेभाज्यांच्या मागणीत घट झाली आहे. नवरात्रोत्सवात अनेकजण उपवास करतात. त्यामुळे पालोभाज्यांच्या फारशी मागणी नसते. पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पितृपक्षात मेथी, कोथिंबिर, अळूच्या मागणीत वाढ झाली होती. किरकोळ बाजारात मेथी, कोथिबिंरेच्या एका जुडीचे ४० ते ५० रुपयांपर्यत जाऊन पोहोचले होते. नवरात्रोत्सवाचा प्रारंभ रविवारपासून झाला. नवरात्रोत्सवात पालेभाज्यांना फारशी मागणी राहणार असून, दर स्थिर आहेत. तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या एक लाख २५ हजार जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा-“…तर मोदी नवीन युनो उभी करतील”, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य
घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबीर १५०० ते २५०० रुपये, मेथीस१५०० ते २२०० रुपये, शेपू ४०० ते ८०० रुपये, कांदापात ६०० ते १००० रुपये, चाकवत ४०० ते ७०० रुपये, करडई ३०० ते ६०० रुपये, पुदिना ३०० ते ८०० रुपये, अंबाडी ३०० ते ६०० रुपये, मुळा ८०० ते १५०० रुपये, राजगिरा- ४०० ते ७०० रुपये, चुका ६०० ते ८०० रुपये, चवळईस३०० ते ७०० रुपये, पालक १२०० ते १८०० रुपये असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
नवरात्रोत्सवात फळे महाग
नवरात्रोत्सवात फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिगंड, खरबूज, पपई, सीताफळ, डाळिंब, पेरु, लिंबू, मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. चिकू, अननस, संत्र्याचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा-पुण्यातील चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी
नवरात्रोतत्सवातील उपवासामुळे फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी केरळ येथून ५ ट्रक अननस, मोसंबी ८० ते ९० टन, संत्री ३० टन, डाळिंब ३० ते ४० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे ७०० गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, पेरू ७०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), सीताफळ ३० ते ३५ टन, चिकू दोन हजार खोकी, सफरचंद ३ ते ४ हजार पेटी अशी आवक झाली.