ख्रिस्ती समाजावर देशभरात होत असणाऱ्या अन्याय -अत्याचाराचा निषेध

देशभरात ख्रिस्ती समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत, चर्चवर हल्ले होत आहेत याचा निषेध करण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील ख्रिस्ती समाजाच्या वतीने शुक्रवारी मूक महामोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा सिटी चर्च नाना पेठ येथून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला. 

हेही वाचा >>>पुणे: कात्रजमध्ये आर्थिक वादातून मित्राचा खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मोर्चाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. वंचित बहुजन आघाडीच्या अंजली प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी नगरसेविका अश्विनी लांडगे, भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष  दत्ता पोळ, अंजुम इनामदार मोर्चाचे समन्वयक प्रशांत केदारी यासह पुणे शहरातील विविध पक्ष, संघटना, ख्रिस्ती पंथ, संघटना व नागरिक उपस्थित होते. या मोर्चात सर्व ख्रिस्ती पंथ कॅथोलिक, प्रॉटेस्टंट ,सी.एन.आय ,मेथडिस्ट सह सर्व पंथ सहभागी झाले होते.