छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि स्वराज्य संघटनांकडून राजभवनापुढे आंदोलने करण्यात आली. राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्वराज्य संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काळे झेंडे दाखविले. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडील काळे झेंडे काढून घेतले तसेच काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा >>>पिंपरीः एसकेएफ कंपनीच्या उपव्यवस्थापकाला ४८ लाखांच्या अपहार प्रकरणी अटक

दरम्यान, पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.लोकशाहीत निदर्शने करणे हा मूलभूत हक्क आहे. काळे झेंडे दाखविणे हा निषेधाचा प्रकार आहे. मात्र पोलिसांनी काळे झेंडे जबरदस्तीने काढून घेतला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि स्वराज्य संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.

हेही वाचा >>>पुणे :डाॅ. मोहन आगाशे यांना ‘गदिमा पुरस्कार’ जाहीर; साधना बहुळकर यांना ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला. ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना रस्त्यातच अडवून त्यांच्या ताब्यातील काळे झेंडे घेण्याचा प्रयत्न केला.काँग्रेसच्या वतीनेही राजभवनापुढे आंदोलन करण्यात आले. राज्यपालांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.