पुणे : ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला केलेल्या मद्य पार्टीची छायाचित्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे दाखवून वाभाडे काढले होते. मद्य पार्टीप्रकरणी १० ते १२ निवासी डॉक्टरांचे सहामाही सत्र पुढे ढकलण्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने केली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यास रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ससूनमध्ये काही निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पिऊन गोंधळ घातला होता. त्यात अस्थिव्यंगोपचार विभागातील काही निवासी डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी मद्य पिऊन शेजारील निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. याप्रकरणी एका निवासी महिला डॉक्टरने तक्रार केली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने १ जानेवारीला नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. संजीवनी आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली. समितीने चौकशी करून अहवाल अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यासमोर सादर केला होता.

hasan mushrif discussion with doctor over phone for further treatment of congress mla p n patil
आमदार पी. एन. पाटील यांना अधिकच्या उपचारांसाठी मुंबईला हलविता येईल काय?; हसन मुश्रीफ यांची डॉक्टरांशी दूरध्वनीवरून चर्चा
devendra fadnavis on rahul gandhi video
“रिक्षा किंवा टॅक्सीचालकांना निबंध लिहायला का लावत नाही?” म्हणणाऱ्या राहुल गांधींना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
uddhav thackeray
“जिथे शिवेसनेची मतं आहेत, तिथे..”; संथ गतीने मतदान सुरु असल्याच्या तक्रारींनंतर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
nashik lok sabha seat, devyani farande, Tensions Flare Between devyani farande and vasant gite, BJP mla devyani farande,
नीट बोल…तुझी जहागीर आहे काय ? नाशिकमध्ये भाजप आमदार कोणावर भडकल्या ?
mumbai crime news, mumbai online fraud marathi news
मुंबई: गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्यांनी केले बँक खाते रिकामे
cbi likely to issue blue corner notice against prajwal revanna in sex scandal case
प्रज्ज्वलविरोधात सीबीआयची ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’? राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र; पीडितांना सहाय्याचे आवाहन
Raj Thackeray
ट्रिपल इंजिन सरकारला मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांना माझ्याकडून…”
Kirit somaiya corruption allegations on candidate contesting lok sabha poll,
सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले पाच जण रिंगणात! एक भाजपकडून, तर मित्रपक्षांकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी

आणखी वाचा-एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?

अहवाल सादर केल्यानंतर त्याबाबत काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे आधीचा चौकशी अहवाल तपासून कारवाई करण्याबाबत अहवाल सादर करण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीने सादर केलेला अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात आला होता. यावर १० ते १२ निवासी डॉक्टरांचे सहामाही सत्र पुढे ढकलण्याची शिफारस संचालनालयाने केली. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने अद्यापपर्यंत कारवाई करणे टाळले आहे. यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगूनही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे उघड झाले आहे.

अधिष्ठात्यांचे मौन

मद्य पार्टी प्रकरणातील दोषी निवासी डॉक्टरांवर कारवाईबाबत विचारले असता ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी मौन धारण केले. वैद्यकीय शिक्षण संचालनालयालाच याबाबत विचारा, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. या प्रकरणातील निवासी डॉक्टरांवर अद्याप कारवाई झाली नाही, याला मार्डच्या पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.