: छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदू उरलेच नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. त्यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

हेही वाचा- “तर मला प्रत्युत्तर द्यावे लागेल…” चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड संतापले

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Hasan Mushriff on shahu maharaj
“महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”, हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहूंना इशारा
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव
MP Sanjay Mandlik felicitated by NCP District President Babasaheb Patil Asurlekar
तर शाहू महाराजांना राज्यसभेवर का पाठवले नाही? संजय मंडलिक यांचा सवाल

पुणे दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आम्ही दोन वेळेस मिशन ४३ करून दाखवले आहे. त्यामुळे ४५ जागा मिळवणे ही काही मोठी गोष्ट नाही. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. कदाचित ४८ जागा येणार नाहीत. म्हणून आम्ही मिशन ४५ ठेवले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा- “सम्मेद शिखरस्थळाबाबतचा निर्णय झारखंड सरकारने मागे घ्यावा”, राज ठाकरे यांची मागणी; म्हणाले, “जैन धर्माला…”

सुप्रिया ताईच्या कार्यकर्त्यांनी त्यांच एकदा तरी ऐकावे

वैयक्तिक पातळीवर होणारी टीका टाळण्याची भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, की सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. पण सुप्रियाताईंचे म्हणणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऐकले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते समाजमाध्यमात सतत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंचे एकदा तरी ऐकावे.

हेही वाचा- Video: “निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर मी लक्ष्मण जगताप यांना फोन बंद करून ठेवायला सांगितलं होतं”, अजित पवारांनी संगितली ‘ती’ आठवण!

म्हणून आम्ही मिशन ४५ ठेवलं

अजित पवार म्हणतात भाजपाकडून लोकसभेत किंवा विधानसभा निवडणुकीत आमच्या एवढ्या जागा येणार अस सांगतात. तर २८८ जागाच लक्ष ठेवाव. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही दोन वेळेस मिशन ४३ करून दाखवलंच ना,त्यामुळे ४५ काही मोठी गोष्ट नाही. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे कदाचित ४८ जागा येणार नाही. म्हणून आम्ही मिशन ४५ ठेवल आहे.