हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे ती नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात. त्यांच्या विचारांचे नाही. देशाला मजबूत नेतृत्व हवं आहे. उद्धव ठाकरे यांना विचारणार कोण? त्यांना तर राहुल गांधी यांच्या समोरच मुजरा करायचा आहे. या व्यतिरिक्त कुठलीही भूमिका त्यांना यापुढे मिळणार नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. देवेंद्र फडणवीस हे श्रीरंग बारणे यांच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते.

हेही वाचा – ग्रीन कॉरिडॉरमुळे दोघांना जीवदान! नाशिकमधून केवळ अडीच तासांत फुफ्फुस अन् मूत्रपिंड पुण्यात

हेही वाचा – प्रवाशांना खुणावताहेत रेल्वेचे ‘व्हिस्टाडोम’! वर्षभरात पावणेदोन लाख जणांचा प्रवास; २६ कोटी रुपयांचे उत्पन्न

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैश्विक प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. ही गल्लीची निवडणूक नाही, दिल्लीची निवडणूक आहे. आपल्याकडे जे नेते येत आहेत ते गल्लीचं भाषण करत आहेत. गद्दार, खुद्दार, खोके, टोके, बोके, त्याच्या पलीकडे जात नाही. पुढे ते म्हणाले, श्रीरंग बारणेंवर ते आरोप करत आहेत. गद्दार म्हणत आहेत. बारणे हे शिवसेनेतच आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या जवळ आहे. ती उद्धव ठाकरे यांच्या जवळ नाही. पुढे ते म्हणाले, माझा त्यांना सवाल आहे. तुम्ही जो उमेदवार दिला, तो कोणत्या शिवसेनेत पैदा झाला? तिथं खुद्दारी चालते, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी राहिलो तर गद्दारी. त्यांच्या विचाराशी गद्दारी कोणी केली असेल तर उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं. ज्या दिवशी काँग्रेससोबत अलायन्स करण्याची वेळ येईल. माझ्या शिवसेनेचे दुकान मी बंद करेन. त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. त्याच दिवशी स्वाभिमानी शिवसैनिकांनी ठरवलं आता तुमच्यासोबत राहणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असतील त्यांच्या विचारांचे वारसदार होऊ शकत नाहीत. विचारांचे वारसदार असलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना उभी आहे, असेही फडणवीस म्हणाले.