विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलघेवडे आणि विश्वासघातकी असून केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार शब्द न पाळणारे आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिंचवड येथे बोलताना केली. अडीच वर्षांतील सरकारची एकूण कामगिरी पाहता, हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले सरकार आहे, असेही ते म्हणाले.

चिंचवड स्टेशन येथे भाजप सरकारच्या विरोधात झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनाला पािठबा देण्यासाठी मुंडे आले होते, तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,की सत्तेत येण्यापूर्वी भाजपने जी आश्वासने दिली होती, त्याचा त्यांना विसर पडला आहे. जनतेने विश्वासाने भाजपला सत्ता दिली, मात्र त्यांनी विश्वासघात केला आहे. फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी भरघोस आश्वासने दिली. मात्र, त्याचे पालन केले नाही. शेतक ऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे ते म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते, तेव्हा त्यांनीही शब्द दिला. स्वामिनाथन आयोग लागू करू, ५० टक्के नफा ठेवून हमीभाव काढू, असा शब्द सरकार आता पाळताना दिसत नाही. अडीच वर्षांत सरकारने काहीच केले नाही. उरलेल्या कालावधीतही ते काही करतील, असे वाटत नाही. देशात ११ हजार शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यातील नऊ हजार शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. गेल्या सरकारवर आरोप करून भाजप नेते जबाबदारी झटकत आहेत. अडीच वर्षांच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांचे एक रूपये व्याज सरकारला माफ करता आले नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. तूरडाळ, कापूस, द्राक्ष, कांदा, फळ उत्पादक शेतकरी नाडले जात आहेत. एकाही मालाला हमीभाव मिळत नाही. या गोष्टींना आघाडी सरकार कसे काय जबाबदार असू शकते?

तूरडाळीचे उत्पादन मोठे झाल्याने राज्यात सध्या भयानक परिस्थिती आहे. आपल्याकडे म्यानमारमधून तूरडाळ आणली जात असल्याची माहिती आपल्याकडे आहे. आपली तूर विकत नाही आणि बाहेरून ती आणली जाते, यासारखे दुर्दैव नाही. २२ एप्रिलपर्यंत तूरडाळ खरेदी करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी ते खोटं बोलत आहेत. शेतकऱ्यांची तूरडाळ खरेदी न केल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू.     धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde slam on devendra fadnavis government
First published on: 29-04-2017 at 02:05 IST