प्रथमेश गोडबोले

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामात आता थेट मंत्र्यांकडून हस्तक्षेप करण्यात येत असून, पुण्याबाहेरील एका ज्येष्ठ मंत्र्याने आपल्या विश्वासातील अधिकाऱ्याकडे महसुली अधिकार दिल्याचा प्रकार घडला आहे. ही बाब नव्याने सत्तेत आलेल्या पुणे जिल्ह्यातील मंत्र्यांना समजल्यावर त्यांनी थेट मंत्रालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश काढायला लावून असले प्रकार थांबवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुण्यातील आणि पुण्याबाहेरील मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या कामाच्या वाटपाबाबत राज्य शासनाने यापूर्वीच आदेश दिले आहेत. मात्र, अपर जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित येणाऱ्या कूळ कायदा उपजिल्हाधिकारी यांचे अधिकार थेट निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जून महिन्यात वर्ग करण्यात आले आहेत. ही बाब नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या मंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी ९ ऑगस्ट रोजी शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय असे बदल करू नयेत, असे आदेश दिले आहेत. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या आदेशाची अंमलबजावणी न करण्यासाठी पुणे जिल्ह्याबाहेरील एका ज्येष्ठ मंत्र्याचा दबाव असल्याची चर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पुण्याबाहेरील एका मंत्र्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात हस्तक्षेप वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही अधिकारी, कर्मचारी वैतागले आहेत.