उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात विधान भवन येथे करोना आढावा बैठकी घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत माहिती दिली. त्यानुसार जिल्ह्याती पहिली ते आठवीपर्यंतच्या ऑफलाईन शाळा बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, निर्बंध अधिक कडक करण्यात आल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याचबरोबर, “माझी समस्त पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्हाला टोकाचं कुठलं तरी पाऊल उचलायला लावू नका.” असा सूचक इशारा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला. या पत्रकारपरिषदेस राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मला सर्वांनाच आवाहन करायचे आहे की, सध्या करोना परिस्थितीही बिकट होत चाललेली आहे. करोना संसर्ग वाढत आहे. मी आता बीएमसीचे आयुक्त चहल यांच्याशी देखील बोललो, तेव्हा त्यांनी सांगितले की मुंबईतही रुग्ण संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईने ऑफलाईन शाळा पहिली ते आठवीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. नववीची शाळा सुरू ठेवली का तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे ते शाळेत आल्यानंतर त्यांना लसीकरण करणं सोपं जातं. त्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी देखील मी बोललो, त्यांनी सांगितलं की याबद्दलचा स्थानिकांना अधिकार दिलेला आहे की तिथली परिस्थिती काय आहे ते पाहून त्यांनी निर्णय घ्यावा. आज इथे बैठक घेत असताना, पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर ७४ टक्केच नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतलेला आहे. माझी समस्त पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्हाला टोकाचं कुठलं तरी पाऊल उचलायला लावू नका.”

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Property worth lakhs was robbed in two house burglaries in nashik
नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
uran, Panvel, Pen, Thousands of Objections, Farmers Register, MMRDA Notification, Development, cidco, marathi news,
एमएमआरडीएच्या अधिसूचनेवर ७ एप्रिलपर्यंत हरकती; उरण, पनवेल, पेण तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांकडून हरकतींची नोंद

पुण्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपये आणि मास्क नसताना थुंकल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड

तसेच, “काहीबाबतीत आज आम्ही महत्वाचे निर्णय घेतोय. परंतु जी ३६ टक्के लोक लस घ्यायची राहिलेली आहेत त्यांनी दुसरा डोस घेतलाच पाहिजे. कारण, दोन्ही लशीचे डोस घेतले आणि जरी करोनाचा संसर्ग झाला तर त्याची तीव्रता कमी राहते, अशा प्रकारचा अनुभव हा आता पाहायला मिळतोय. तसेच, पुणे जिल्हा आणि दोन्ही महापालिका या संदर्भात असा निर्णय घेण्यात आला आहे की, पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारी २०२२ पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. नववीची शाळा सुरू राहील. तर, पहिली ते आठवीच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू राहतील. आज आम्ही हा सगळा निर्णय घेत असताना, आयसीएमआरचे महासंचालक भार्गव यांच्याशी देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलले. त्यांनी देखील सांगितलं की, ही जर पॉझिटिव्हिटीची परिस्थिती १० टक्क्यांच्या पुढे गेलेली असेल तर तुम्ही तशा पद्धतीचा निर्णय घ्या.” असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

याचबरोबर, “मला आज पुणेकरांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, पुणे शहरात साधारण पॉझिटिव्हचा दर १८ टक्क्यांपर्यंत गेलेला आहे. ज्यावेळेस १८ टक्क्यांवर पॉझिटिव्हिटीचा रेट जातो, त्यावेळी निश्चितपणे काळजी करण्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणून काळजीने आम्ही अशाप्रकारचा निर्णय घेतलेला आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतोय, पुढील ३० ते ४५ दिवसात रूग्ण संख्येचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या ऐकीव बातम्या आहेत पण १०५ देशात ओमायक्रॉनचा आजच्या घडीला प्रसार झालेला आहे. भारतापुरतं बोलायचं झालं तर २३ राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात ११ ठिकाणी ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या पुणे शहरात ३ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. यापैकी ८८ रूग्ण ऑक्सिजनवर आहेत आणि ३६ रूग्ण व्हेंटिलेटर्सवर आहेत. तसेच, मी आजच्या पत्रकारपरिषदेतून सर्व नागरिकांना एक सांगू इच्छितो, आता हा पूर्वीचा करोना आहे का, डेल्टा करोना आहे की ओमायक्रॉनचा हा विषाणू आहे यामध्ये आता फार चर्चा करण्याची गरज नाही. सुरूवातीच्या काळात ओमायक्रॉन भारतात आलेला नव्हता म्हणून त्याबाबत केंद्र व राज्य सरकार आणि सर्व यंत्रणा फार बारकाईने ते बघत होती. पण ज्या प्रकारे आता संख्या पाहायला मिळत आहे, आता हा ओमायक्रॉन जवळपास आपल्या राज्यात आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेला आहे. पुणे शहरात आज ६ हजार ८१९ लोकांची तपासणी झाली आहे, त्यापैकी ११०४ रुग्ण हे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे १८ टक्क्यांपर्यंतचा पॉझिटिव्हीटी दर पाहायला मिळत आहे. तीन दिवसांनी रूग्ण संख्या दुप्पट आढळून येताना दिसत आहे. त्यामुळे आपण ३० जानेवारी २०२२ पर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या ऑफलाईन शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.