पुणे आणि पुणेकरांची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. कधी एखादी पुणेरी पाटी व्हायरल होते तर कधी एखादा पुणेकर चर्चेत येतो. कधी पुणेरी रिक्षावाले चर्चेत येतात तर कधी पुणेरी आजी किंवा आजोबा मस्तपैकी नाचताना दिसतात. कधी एखाद्या पुणेरी काकू बेशिस्त पुणेकरांना शिस्त लावताना दिसतात तर कधी एखादे पुणेकर काका हटके जुगाड करताना दिसतात. सध्या अशाच एका पुणेरी काकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जुगाडू पुणेरी काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पावसापासून वाचण्यासाठी पुणेरी काकांनी हटके जुगाड शोधला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या परतीच्या पावसाने पुण्यात हजेरी लावलेली आहे त्यामुळे दिवसभरात केव्हाही अचानक पाऊस सुरु होतो ज्यामुळे पुणेकरांची धांदल उडते. छत्री-रेनकोट न घेता घराबाहेर पडलेल्या नागरिकांची ऐनवेळी पाऊस आला की तांराबळ होते. पण शेवटी पुणेकर कधी हार मानतात का? काहीही झाले तरी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे काही नाही काही जुगाड हा असतो. अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी पुणेरी काकांनी हटके जुगाड शोधून काढला आहे.

हेही वाचा –“तुम्ही एकदा पुण्यात राहिला की दुसरीकडे कुठेच मन लागत नाही…!”, Viral Video पाहून काय म्हणाले पुणेकर?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक काका रस्त्यावरून बाईकवरून जात आहे. पावसापासून वाचण्यासाठी काकांनी चक्क मोठी प्लास्टिकची पिशवी अंगावर चढवली आहे. एवढंच नाही तर पिशवी फाडून हात आणि डोकं बाहेर काढण्यासाठी थोडीशी जागा केली आहे. डोक्याला रुमाल बांधून काका बिनधास्तपणे पावसाची चिंता न करता बाईक चालवत आहे. छत्री रेनकोट नसला तरी काहीतरी जुगाड करून काकांनी स्वत:ला भिजण्यापासून वाचवले आहे.

हेही वाचा –“ती हो म्हणाली की नाही ते महत्त्वाचं नाही पण, प्रप्रोज खूप भारी होता”; भररस्त्यात तरुणाने हटके शैलीत तरुणीला केलं प्रपोज, Viral Video

इंस्टाग्रामवर laibharipune पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “जुगाडू पूणेकर काका”असे कॅप्शन दिले आहे. व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काहींनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

एकाने लिहिले,”मस्त” तर दुसऱ्याने लिहिले की, “खूप सुंदर, खूप छान”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला कसा वाटला पुणेकर काकांचा हटके जुगाड?