पुणे : जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची बदली करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. डाॅ. देशमुख यांची बदली राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून करण्यात आली असून त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी पदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या वर्तुळाकार मार्गाच्या भूसंपादनात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. प्रलंबित ई-फेरफार प्रकरणेही त्यांनी गतीने मार्गी लावली होती. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे कामही त्यांच्या कारकिर्दीत झाले होते.

हेही वाचा >>>सीईटीच्या अर्जांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. दिवसे यांनी यापूर्वी पीएमआरडीए आयुक्त, कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आकृतीबंध आणि नियमावली त्यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आली. तसेच पीएमआरडीएचा विकास आराखडा त्यांच्या कार्यकाळात प्रसिद्ध झाला. तसेच त्यावर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्याची प्रक्रियाही त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली होती.