पुणे : गानवर्धन संस्थेच्या वतीने प्रसिद्ध संवादिनीवादक डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे यांना पं. अप्पासाहेब जळगावकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दहा हजार रुपये, शाल आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पौड रस्त्यावरील बेडेकर गणपती मंदिर येथे शनिवारी (२१ जून) सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते सहस्रबुद्धे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने सहस्रबुद्धे यांचे स्वतंत्र संवादिनीवादन आणि ज्येष्ठ गायिका डाॅ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या शिष्या सानिका कुलकर्णी यांचे गायन होणार आहे, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.