पुणे : यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत घटला आहे. गेल्यावर्षी दहावीचे ९३.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यंदा ९२.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ९ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण २२ दिव्यांग गटातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली. यातील तीन प्रकारातील विद्यार्थ्यांचा निकाल १०० टक्के, तर १५ प्रकारातील विद्यार्थ्यांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागला आहे.

सर्वाधिक १ हजार ९४१ विद्यार्थ्यांनी लोकोमोटर डिसॅबिलिटी प्रवर्गातून परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ७८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अंध गटातून १ हजार २६८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रवणदोष गटातून नोंदणी केलेल्या १ हजार ८२० विद्यार्थ्यांपैकी १ हजार ५१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले झाले. ‘स्पेसिफिक लर्निंग डीआय’ प्रवर्गातून नोंदणी केलेल्या १ हजार २४९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तीन विद्यार्थ्यांना विशेष सुविधायंदाच्या परीक्षेत तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याची गरज लक्षात घेऊन विशेष सुविधा देण्यात आली होती. त्यात एका विद्यार्थ्याला हेडटॉर्च वापरून, तर मुंबईतील दोन विद्यार्थ्यांना वातानुकुलित व्यवस्थेत परीक्षा देण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

गट आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्याअंध गट – १ हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण

श्रवणदोष गट – १ हजार ५१९ विद्यार्थी उत्तीर्ण‘स्पेसिफिक लर्निंग डीआय’ प्रवर्ग – १ हजार २३४ विद्यार्थी उत्तीर्ण