पुणे : पुण्यातील व्यावसायिकांवर सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) सोमवारी छापे टाकण्यात आले. ईडीच्या पथकाने शहरात नऊ ठिकाणी छापे टाकले.
ईडीच्या मुंबईतील पथकाने सोमवारी सकाळी व्यावसायिक विवेक गव्हाणे, सनदी लेखापाल जयेश दुधडिया आणि ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांचे कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. सॅलसबरी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रस्ता, सिंहगड रस्ता परिसरा ईडीच्या पथकाने कारवाई केली.
गेल्या महिन्यात ईडीच्या पथकाने चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयात छापे टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी चंद्रकांत गायकवाड संबंधित आहेत. त्या वेळी गायकवाड यांच्या कार्यालयातून ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली होती तसेच गायकवाड यांची चौकशी केली होती.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.