कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या देखभालीचे काम पुणे महापालिकेकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी २१ ते ३१ जानेवारी या कालावधीत विद्युतदाहिनी क्रमांक एक बंद राहणार आहे.
हेही वाचा- काश्मिरी महिलांच्या बेकरी व्यवसायाला पुणेकरांच्या मार्गदर्शनाची जोड
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पुणे महापालिकेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेकडून करण्यात येणार आहे. हे काम २१ ते ३१ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार असल्याने या कालावधीत विद्युतदाहिनी क्रमांक एक बंद ठेवली जाईल. तर विद्युतदाहिनी क्रमांक दोन आणि एपीसी सिस्टिमची सुविधा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.