२८०० सोसायट्यांची प्रक्रिया पूर्ण; २५५ प्रकरणांच्या सुनावण्या सुरू

पुणे : इमारतीची जागा गृहनिर्माण संस्थेच्या नावे करून मालकी हक्काची समस्या दूर करण्यासाठी मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेयन्स) खास मोहीम सहकार विभागाने सुरू के ली आहे. त्याला पुण्यातील सोसायट्यांनी उत्स्फू र्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत तब्बल २८३२ संस्थांची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर २५५ हस्तांतरणांच्या प्रकरणांवर जिल्हा उपनिबंधक (शहर) यांच्याकडे सुनावणी सुरू आहे.

शहरातील १७ हजार ६०० नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांपैकी बहुतांश संस्थांचे अद्याप अभिहस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे या संस्थांच्या इमारतीची जागा अद्यापही बांधकाम व्यावसायिकांच्या ताब्यात असल्याने संबंधित

संस्थांना इमारतीचा पुनर्विकास आणि मालकी हक्काबाबत गंभीर समस्या होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने हस्तांतरणासाठी खास मोहिमेचे आयोजन के ले आहे. त्याअंतर्गत २८३२ संस्थांना हस्तांतरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२० अखेर शहर कार्यालयाकडे २६४६ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी २४८२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. चालू वर्षात ३१ जुलैपर्यंत ४४१ दाखल प्रस्तावांपैकी ३५० सोसायट्यांचे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सद्य:स्थितीत २५५ अर्जांवर सुनावणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (शहर) नारायण आघाव यांनी दिली.

दरम्यान, इमारतीच्या जागेचे हस्तांतरण सोसायटीला करून देणे कायद्यानुसार बांधकाम व्यावसायिकाला बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक हस्तांतरण करून देत नाही, त्याठिकाणी जिल्हा उपनिबंधक स्वत: पुढाकार घेऊन एखाद्या मालमत्तेमधील ठरावीक इमारतीच्या भागाचे हस्तांतरण करून देण्याबाबतचा आदेश काढू शकतात. त्यानुसार मिळकत पत्रिका किं वा सातबाऱ्यावरील मूळ मालकाचे नाव जाऊन त्याठिकाणी सोसायटीचे नाव येते.

मानीव अभिहस्तांतरणाचे टप्पे

मानीव अभिहस्तांतरणासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे विहित नमुना सातमध्ये आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा आणि आदेश व प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. हस्तांतरणाचा मसुदा दस्त सर्व सदनिकाधारकांच्या मुद्रांक शुल्काच्या तपशिलासह संबंधित जिल्हा निबंधक यांच्याकडून अभिनिर्णय (अ‍ॅड्ज्युडिके शन) करून घ्यावा. अभिनिर्णयाच्या आदेशानंतर दस्त संबंधित कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करून घ्यावा. नोंदणीकृत दस्तानुसार संबंधित नगर भूमापन अधिकारी किं वा मंडल अधिकारी किं वा तलाठी यांच्याकडे सातबारा नोंदणीसाठी अर्ज करावा. संबंधित मालमत्ता पत्र किं वा सातबारा उताऱ्यावर भोगवटादार म्हणून संस्थेचे नाव नोंदणीनंतर मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही आघाव यांनी सांगितले.

अधिकाधिक सोसायट्यांच्या हस्तांतरणाचे आव्हान

शहरातील १७ हजार ६०० नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांपैकी बहुतांश संस्थांचे अभिहस्तांतरण झालेले नाही. खास मोहिमेंतर्गत २८३२ संस्थांनी प्रक्रिया पूर्ण के लेली असली, तरी उर्वरित संस्थांनी खासकरून जुन्या गृहनिर्माण संस्थांचे हस्तांतरण करून घेण्याचे आव्हान अद्यापही कायम आहे. सध्या शहरातून हस्तांतरणाची दररोज चार प्रकरणे दाखल होत आहेत. ज्या सोसायट्यांमध्ये जमीन आणि इमारत गृहरचना संस्थेच्या नावावर मालमत्तापत्रकात नाही, अशांनी तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रक्रिया कशी कराल?

हस्तांतरण प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ‘महासरकार डॉट इन’ नावाचे संके तस्थळ आहे. या संके तस्थळावर सोसायटी नोंदणीसाठी पाच ते सहा प्रकारची कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकते. त्यानंतर सोसायटीला एक हस्तांतरणाचा क्रमांक ऑनलाइन प्राप्त होतो. त्या क्रमांकाची संपूर्ण फाइल मुद्रित करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जमा करावी लागते. त्यानंतर कागदपत्रांची छाननी होऊन बांधकाम व्यावसायिक आणि सदनिकाधारकांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते.