पुणे प्रतिनिधी : पुण्यातील शिवाजीनगर भागात राहणारे एक उच्चशिक्षित दाम्पत्य, त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीसह त्यांचे आयुष्य सुरळीत सुरू होते. पण साधारण वर्षभरापूर्वी त्यांच्यात वाद सुरू झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांनी न्यायालयात अर्जही दाखल केला होता. त्यांच्या मुलीने वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला, पण गेले आठ महिने आई-वडील वेगळे राहत असल्याने ती एकटी पडली होती. सदर विद्यार्थिनी ही शाळेत दहावीची टॉपर असून तिच्याशी बोलण्यासाठी घरात कोणी नव्हते आणि ती मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नव्हती. याच एकटेपणामुळे ती खूप तणावात होती.

एक दिवस तिने कोणालाही न सांगता पिंपरी चिंचवडला जाऊन आईची भेट घेतली. परत येताना शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर ती भांबावून गेली. पुन्हा त्याच घरात, त्याच एकटेपणात परत जायचं या विचाराने तिला काहीही सुचत नव्हते. याच वेळी तिला शाळेतील एका कार्यक्रमाची आठवण झाली. पुणे शहर पोलिसांच्या ‘दामिनी पथका’ने शाळेत ‘गुड टच, बॅड टच’विषयी मार्गदर्शन केले होते. त्यावेळी सोनाली हिंगे यांनी मदत लागल्यास फोन करण्याचे सांगितले होते.

तिने तात्काळ सोनाली हिंगे यांना फोन केला. “दीदी, मला मदतीची गरज आहे, मी घर सोडून चालली आहे,” असे म्हणत तिने आपला तणाव व्यक्त केला. मुलीचे बोलणे ऐकून सोनाली हिंगे यांनी तिला धीर दिला आणि ती जिथे होती, तिथेच थांबायला सांगितले. त्यांनी तात्काळ शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर जाऊन तिची भेट घेतली.

सोनाली हिंगे यांनी मुलीची समजूत घातली आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून मुलीच्या वडिलांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये येऊन सोनाली हिंगे यांचे आभार मानले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, “आम्ही विभक्त होण्याचा निर्णय मागे घेत आहोत. आमच्या मुलीशी संवाद साधून आम्ही यापुढे एकत्र राहू.” या घटनेमुळे दामिनी पथकाच्या मदतीने एक कुटुंब पुन्हा एकत्र आले.णि सोनाली हिंगे यांचे आभार मानत, आम्ही विभक्त होण्याचा मागे घेणार असून आमच्या मुलीशी यापुढील काळात संवाद साधू, आम्ही विभक्त होण्याच्या मार्गावर होतो. आता आम्ही एकत्र येणार असल्याची ग्वाही पोलिसांना त्यांनी दिल्याचे दामिनी पथकाच्या सोनाली हिंगे यांनी सांगितले.