पिंपरी : भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अभियंता तरुणाला धडक दिल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. नेरे-दत्तवाडी रस्त्यावरील एक्झर्बिया गृहनिर्माण सोसायटीत घडलेल्या या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून, अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

लेखराज हरी फिगडे (वय २७, रा. दत्तवाडी, ता. मुळशी, मूळ – जळगाव) असे जखमी अभियंत्याचे नाव आहे. त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोटारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिगडे हे २ जून रोजी रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. एक्झर्बिया सोसायटीत समोरून भरधाव आलेल्या मोटारीने जोरात धडक दिल्याने फिगडे हे रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. त्यांच्या हात, पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळावरून पसार झाला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपी मोटारचालकाचा शोध सुरू असल्याचे हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: हर्नियावर फंडोप्लिकेशनद्वारे उपचार यशस्वी! जाणून घ्या या प्रक्रियेविषयी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाकडमध्ये मोटारीच्या धडकेत तरुण जखमी

रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव मोटारीने पाठीमागून जोरात धडक दिल्याने तरुण जखमी झाला. ही घटना वाकड पुलाखाली घडली. सचिन भगवान तांबारे (वय २२, रा. संगम चौक, शास्त्रीनगर, कोथरूड) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनोळखी मोटारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ४ जून रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास तांबारे हे वाकड पुलाखाली उभे होते. या वेळी भरधाव आलेल्या मोटारीने पाठीमागून जोरात धडक दिल्याने तांबारे हे रस्त्यावर पडल्याने जखमी झाले.