एस्सेलवर्ल्ड या अम्युझमेंट पार्कमध्ये ‘टॉप स्पिन’ ही नवीन राईड सुरू करण्यात आली आहे. ‘पॅन इंडिया पर्यटन’ या कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे आणि कंपनीच्या विपणन व विक्री विभागाचे प्रमुख भूषण मोटियानी यांनी पत्रकार परिषदेत या नवीन राईडविषयी माहिती दिली.
टॉप स्पिन या राईडमध्ये बसून सहभागी व्यक्तींना ३६० अंशांचा झोका घेता येणार आहे. या राईडमध्ये पाण्याच्या फवाऱ्यांच्या अतिरिक्त आकर्षणाचाही सहभाग आहे. ही राईड १४ वर्षांवरील व्यक्तींसाठीच आहे.
राईडच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून राईडच्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी विशिष्ट टीमची नियुक्ती केली असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
एस्सेलवर्ल्डमध्ये ‘टॉप स्पिन’ ही नवीन राईड सुरू
एस्सेलवर्ल्ड या अम्युझमेंट पार्कमध्ये ‘टॉप स्पिन’ ही नवीन राईड सुरू करण्यात आली आहे.

First published on: 20-04-2013 at 02:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enjoy new ride top spin at essel world