पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये सुरू होणाऱ्या दहावी परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नियमित शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन आणि आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

त्याची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर मंडळाकडून अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी पत्रकाद्वारे दिली.येत्या दहावी परीक्षेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत आहे. त्याप्रमाणे संबंधित माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून चलन डाऊनलोड करून शुल्क २३ नोव्हेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत भरायची आहे. तसेच विलंब शुल्कासह १ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येईल. सविस्तर माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Story img Loader