पुणे : गृहप्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाख ७५ हजारांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी चेतन सुभाष बालवडकर (वय ३५), रोहन सुभाष बालवडकर (वय ३३, दोघे रा. बालेवाडी), सागर वसंत बालवडकर (वय ३५, रा. धायरी), आदित्य दत्तात्रय हगवणे (३३, रा. कोंढवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कर्वेनगर येथील बांधकाम व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – Video: पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या आशायाचे स्टीकर लावण्यात आले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालेवाडी भागात बांधकाम व्यावसायिकाकडून गृहप्रकल्प बांधण्यात येत आहे. आरोपी बालवडकर, हगवणे गृहप्रकल्पावर गेले. त्यांनी काम बंद पाडण्याची धमकी दिली, तसेच बांधकाम व्यावसायिकाची समाजमाध्यमावर बदनामी करण्याची धमकी देऊन वेळोवेळी २६ लाख ७५ हजार रुपये उकळले. पैसे उकळल्यानंतर आरोपींनी बांधकाम व्यावासयिकाकडे गृहप्रकल्पातील दोन सदनिका नावावर करून देण्याची मागणी केल्याचे बांधकाम व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे.