पिंपरी चिंचवड: बावधन येथील भोंदू बाबा प्रसाद तामदार प्रकरणी आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत. सध्या प्रसाद तामदार हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. या तथाकथित भोंदू बाबाने अनेकांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं उघड झालं आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. प्रसाद तामदार हा दिव्य शक्ती प्राप्त झालेला बाबा म्हणून प्रचलित होता. परंतु, ज्या ऍप ने त्याला दिव्य शक्ती प्राप्त झाली, त्याच ऍप ने भोंदू बाबाचा भांडाफोड केला.
सध्या या सगळ्या प्रकरणात प्रसाद तामदार उर्फ भोंदू बाबा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. पोलिसांच्या तपासादरम्यान प्रसाद तामदार च्या लॅपटॉपमध्ये भक्तांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं आढळलं आहे. भोंदू बाबा भक्तांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, गर्लफ्रेंड किंवा इतर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेऊन मोबाईलद्वारे बघायचा. अनेक भक्तांचे व्हिडिओ बाबाने आपल्या लॅपटॉपमध्ये रेकॉर्ड करून सेव्ह केले आहेत.
याबरोबरच या प्रसाद तामदारला अश्लील आणि पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय असल्याचं देखील उघड झाल आहे. प्रसाद च्या लॅपटॉपमध्ये पॉर्न व्हिडिओ चे अनेक फोल्डर आढळले आहेत. शेकडो अश्लील व्हिडिओ आढळले आहेत. अनेक पुरुष भक्तांसोबत बाबाने अनैसर्गिक कृत्य केलेलं आहे. हे आधीच उघड झालेलं आहे. शेकडो तरुणांची फसवणूक झालेली असली तरी अद्याप पीडित तरुणांची संख्या मोठी असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
अनेक तरुणांसोबत बाबाने थेट अनैसर्गिक कृत्य केलेलं आहे. बाबाच्या या कृत्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही, म्हणून अनेक जण गप्प होते. परंतु, बाबाचा भांडाफोड झाला. आता तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. गुरू पौर्णिमेला अनेक भक्तांनी या भोंदू बाबाचा मठ गाठला होता. या अंधभक्तांच्या डोळ्यावरील पट्टी उतरणे गरजेची आहे. अशा अंधभक्तांमुळे असे बाबा मोठे होतात. भक्तांनी अशा भोंदू बाबांपासून दूर राहिले पाहिजे. अस वारंवार पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.