अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्यापुढे शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत-धर यांचं आव्हान असणार आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत त्यांचं पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी नाव जाहीर करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून अनेक नाव पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी पुढे येत होती. अखेर आज सुलक्षणा शीलवंत- धर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

हे ही वाचा… दुचाकी पुढे नेण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून तरुणाचा खून

u

u

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत- धर असा सामना रंगणार आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता वर्तवली जात होती. यासाठी अनेक जणांनी फिल्डिंग देखील लावली. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या समर्थक असलेल्या आणि निकटवर्तीय असलेल्या सुलक्षणा शीलवंत-धर या गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी विधानसभेसाठी तयारी करत होत्या. परंतु, ऐनवेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून वेगवेगळी नावे समोर येत होती. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून उत्कंठा होती. अखेर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सुलक्षणा शीलवंत-धर यांना उमेदवारी मिळाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आता थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत- धर अशी लढत होणार आहे.