डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानात सोमवारी सकाळी आग लागण्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही काळानंतर आग आटोक्यात आली असून, दुकानातील क्रीडा साहित्य जळाले आहे. पाच अग्निशमन बंबांच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली. दरम्यान, आगीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2022 रोजी प्रकाशित
पुणे : डेक्कनमधील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानाला आग
काही काळानंतर आग आटोक्यात आली असून, दुकानातील क्रीडा साहित्य जळाले आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
Updated: 
First published on: 17-10-2022 at 10:24 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at champion sports shop in deccan pune print news tmb 01