पुणे : मार्केट यार्डातील भुसार बाजार परिसरात असलेल्या एका किराणा माल, मसाले, सुकामेव्याची विक्री करणाऱ्या दुकानात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत किराणा माल, मसाले, सुकामेव्याची पाकिटे जळाली.

मार्केट यार्ड भुसार बाजारातील प्रवेशद्वार क्रमांक पाच परिसरात अगरवाल ट्रेडर्स सुकामेवा, मसाले आणि किराणा माल विक्रीचे दुकान आहे. दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती सकाळी सव्वादहाच्या सुमारास अग्निशमन दलाला कळविण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे तीन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्याने जवानांनी पाण्याचा मारा केला. धूर मोठ्या प्रमाणावर झाल्याने आग आटोक्यात आणताना अडथळे आले. दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामात तसेच दुकानात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. शिडी लावून जवान गोदामात शिरले. पाण्याचा मारा करून अर्धा तासात आग आटोक्यात आणली.

हेही वाचा – दहावी, बारावीच्या परीक्षेत यंदा गैरप्रकारांमध्ये घट; बारावीच्या परीक्षेत २६०, तर दहावीच्या परीक्षेत ११३ गैरप्रकारांची नोंद

हेही वाचा – पुणे : मुरलीधर मोहोळ यांच्या नावे खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने केली अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रदीप खेडेकर, सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. आगीत दुकानातील मसाले, सुकामेवा, किराणा माल जळाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.