पिंपरी : सांगवी परीसरामध्ये वर्चस्व रहावे यासाठी हवेत गोळीबार करणाऱ्याला साथीदारासह पोलिसांनी अटक केली. सुजल राजेंद्र गिल (वय १८ रा. रा. विनायकनगर, सांगवी), रिहान आरिफ शेख ( वय १९ रा. भाऊनगर, साठफुटी रोड, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी सुजल हा जुनी सांगवी परिसरामध्ये लोकांना दमदाटी करतो. साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण करणारी कृत्ये वारंवार करतो. या भागात सतत आपले वर्चस्व रहावे म्हणून आरोपी सुजल याने १६ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता हवेत गोळीबार केला. लोकवस्तीमध्ये दहशत निर्माण केली. सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेसाठी धोकादायक कृत्य केले. आरोपीचा सांगवी पोलीस शोध घेत होते. सोमवारी रात्री आरोपी सुजल हा सांगवीतील गणपती विसर्जन घाटावरील रस्त्यावर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा – पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ८१ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी सुजल आणि त्याचा साथीदार रिहान याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा ४६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.