पुणे : घोरपडे पेठेत तरुणावर गोळीबार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी संध्याकाळी धायरी भागातील रायकर मळा परिसरात तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली.

हेही वाचा – ललित पाटील प्रकरणानंतर ससूनच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांनाही पद नकोसे

हेही वाचा – भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले; जळगावमधील चोरटे गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेत पंचवीस वर्षांचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धायरीतील रायकर मळा परिसरात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हल्लेखोरांनी तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला धायरीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणावर पूर्व वैमन्यासातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.