पिंपरी : बीडमधील पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरून अटक असलेला आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडची वाकड येथील सदनिका लाखबंद (सील) करण्यात येणार आहे. या सदनिकेचा दीड लाखांचा मालमत्ता कर थकला आहे.

हेही वाचा >>> ‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी, करणाऱ्या चोरट्यासह साथीदार गजाआड, ८० लाखांच्या ऐवजासह पिस्तूल, काडतुसे जप्त

वाकड येथील पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटीच्या आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ६०१ क्रमांकाची वाल्मीक कराड आणि त्याची पत्नी मंजली कराड यांची सदनिका आहे. १६ जून २०२१ रोजी ही सदनिका खरेदी केली आहे. सदनिका खरेदी केल्यापासून कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर भरला नाही. त्यामुळे महापालिकेने कराडच्या सदनिकेवर २१ नाेव्हेंबर २०२४ जप्ती अधिपत्र चिकटविले आहे.

हेही वाचा >>> पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कराडकडे एक लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे सदनिका लाखबंद केली जाणार आहे. दरम्यान, कराड याची वाकड येथे आणखी एक सदनिका आहे. कराड यांच्या सदनिकेची एक लाख ५५ हजारांची थकबाकी आहे. त्यामुळे सदनिका लाखबंद केली जाणार आहे. थकबाकी न भरल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.