दिवाळीत आरोग्यदायी सुकामेवा आणि परदेशी फळांच्या पेट्या भेट देण्याकडे कल वाढला आहे. सुकामेव्याच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली असून करोना संसर्गानंतर सुकामेवा आणि परदेशी फळांच्या पेट्यांना मागणी वाढली आहे. दिवाळीत आप्तेष्ट, मित्र, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मिठाई भेट देण्याची प्रथा आहे. मिठाई नाशवंत असल्याने गेल्या काही वर्षांपासून सुकामेवा भेट देण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून परदेशातील फळे भेट देण्यात येत आहेत. परदेशी फळांसह भारतीय फळांच्या पेट्या मार्केट यार्डातील फळबाजारातील व्यापाऱ्यांकडे विक्रीस उपलब्ध आहेत. सुकामेव्याच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. करोना संसर्गानंतर सुकामेवा आणि परदेशी फळांच्या पेट्यांना मागणी वाढलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फळांच्या पेटीत न्युझीलंडमधील ॲपल क्वीन सफरचंद, दक्षिण आफ्रिकेतील पिअर, अफगाणिस्थानातील प्लम, द्राक्ष, खजूर, कॅनडाची चेरी, न्युझीलंडचे किवी, पेरूमधील अवाकडू, ब्ल्यूबेरी, पर्सिमन, संत्री, ड्रॅगन आदी फळांचा समावेश आहे. फळांच्या पेटीत भारतातील डाळिंब, सीताफळ, मोसंबी, संत्री, सिमरन, सफरचंद, पपई, चिकू, पेरू, ड्रॅगन, किवी आदी फळांचा समावेश आहे, असे मार्केट यार्डातील फळ व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे: चंदननगरमध्ये अफूची विक्री करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

सुकामेव्याच्या दरात घट

यंदा सुकामेव्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. बाजारात सुकामेव्याची आवक मुबलक होत आहे. पिस्ता, अंजीर वगळता अन्य सुकामेव्याच्या प्रकारात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. दिवाळीत सुकामेव्याला मागणी चांगली आहे. खासगी कंपन्या, कार्यालयांकडून सुकामेव्याच्या खोक्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे, असे मार्केट यार्डातील सुकामेव्याचे व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.

फळांच्या पेट्यांचे दर

भारतीय फळांची पेटी- १२०० ते १५०० रुपये
परदेशातील फळांची पेटी- २२०० ते २५०० रुपये

हेही वाचा : महामेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; राज्य सरकारचे आदेश

घाऊक बाजारातील सुकामेव्याचे एक किलोचे दर

बदाम- ६५० ते ८०० रुपये
अख्खा अक्रोड- ६०० ते ८०० रुपये
अक्रोड- ८०० ते ११०० रुपये
काजू- ७०० ते १००० रुपये
जर्दाळून – ३८० ते ६०० रुपये
मनुके- २५० ते ३०० रुपये
अंजीर- १००० ते १६०० रुपये
हिरवा पिस्ता- १७०० ते २२०० रुपये
खारा पिस्ता- १००० ते १३०० रुपये
खजूर- ३०० ते ६०० रुपये

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign fruits diwali 2022 decrease dry fruits rate in this year pune print news tmb 01
First published on: 26-10-2022 at 13:59 IST