scorecardresearch

वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ आता ३ ऑक्टोबरला

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ २४ सप्टेंबरला घेण्याचे नियोजन होते.

वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ आता ३ ऑक्टोबरला
संग्रहित फोटो

पुणे : वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२चे काही पेपर एकाच दिवशी, २४ सप्टेंबरला होणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) वनसेवा मुख्य परीक्षा २०२१च्या वेळापत्रकात बदल केला. वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ आता २४ सप्टेंबरऐवजी ३ ऑक्टोबरला घेण्यात येईल. 

हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

 एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ २४ सप्टेंबरला घेण्याचे नियोजन होते. मात्र यूपीएससीच्या प्रसिद्धिपत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२चे काही पेपर २४ सप्टेंबरला घेण्यात होणार आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याचे निदर्शनास आल्याने पात्र उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ची तारीख बदलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्यानुसार आता वनसेवा वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ आता २४ सप्टेंबरऐवजी ३ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. परीक्षेची अधिसूचना, जाहिरातीमधील इतर अटी-शर्तींमध्ये कोणताही बदल नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Forest service main exam 2021 now 3rd october upsc pune print news ysh

ताज्या बातम्या