पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे डॉ. कारभारी काळे यांनी स्वीकारली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे बुधवारी स्वीकारली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे बुधवारी स्वीकारली. सावित्रीबाई फुले विद्यापीठ नेहमीच आदरस्थानी राहिले आहे. आता कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर मनात उत्कट भावना असून, माझ्या कार्यकाळात विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना डॉ. काळे यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी संपला. राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली नसल्याने नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे डॉ. काळे यांच्याकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यानुसार डॉ. करमळकर यांनी काळे यांच्याकडे कुलगुरू पदाची सूत्रे सोपवली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Forms post pune university dr karbhari kale accepted pune print news amy

Next Story
पहाडी पोपट, लव्हबर्ड बाळगणाऱ्या एकास अटक; वन विभाग, पोलिसांकडून १२६ लव्हबर्ड, तीन पोपटांची सुटका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी