पुणे : टाइम्स हायर एज्युके शनच्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२२मध्ये राज्यातील चार उच्च शिक्षण संस्थांनी पहिल्या एक हजारात स्थान मिळवले आहे. त्यात मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने (आयसीटी) ६०१ ते ८०० या गटात, तर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे), सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ या पुण्यातील तीन संस्थांनी ८०१ ते १००० या गटात स्थान प्राप्त के ले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम्स हायर एज्युकेशनची जागतिक विद्यापीठ क्रमवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेची मानली जाते. अध्यापन, संशोधन, ज्ञान हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन अशा निकषांवर जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करून क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार ९९ देशांतील १ हजार ६०० हून अधिक संस्थांचे मूल्यमापन करून २०२२साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four educational institutions in the state rank in the world university rankings akp
First published on: 05-09-2021 at 01:08 IST