पिंपरीमध्ये काल (शुक्रवारी) भरदिवसा झालेल्या संतोष कुरावत यांच्यावरील गोळीबारप्रकरणी चार संशयीतांना आज वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी सुरु असून लवकरच या गोळीबारामागील कारण उघडकीस येईल अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आज पहाटे पुन्हा पिंपरी-चिंचडवमध्ये एकावर गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

पिंपरीमधील साधू वासवानी चौकातील ओम शिव या हॉटेलमध्ये घुसून चार अज्ञातांनी संतोष कुरावत यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी त्यांच्या डोक्याला चाटून गेली तर दुसरी गोळी त्यांच्या पोटात लागली होती. गंभीर जखमी झालेल्या संतोषवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पोलिसांना एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले होते ही घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली होती. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात येत होता, अखेर आज दुसऱ्या दिवशी पोलिसांनी चार संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

salman khan firing case marathi news,
सलमान खान गोळीबार प्रकरण: पंजाबमधून अटक आरोपींना घेऊन पथक मुंबईत दाखल, आज न्यायालयापुढे हजर करणार
अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन…
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल

यापूर्वी १० सप्टेंबरला पिंपळे गुरवमध्ये डॉक्टर अमोल बीडकर यांच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले होते. यानंतर दोन दिवसानंतर म्हणजे १२ सप्टेंबरला महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाची हत्या झाली होती. या घटना ताज्या असताना पुन्हा गोळीबाराची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.