पिंपरी : हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हिंजवडी आयटी पार्कमध्ये विप्रो सर्कलजवळ घडली.

बसचा मागील दरवाजा न उघडल्याने चौघांचाअंत झाला. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एका महिलेसह चार कामगारांनी प्रसंगावधान राखत बसमधून उडी मारल्याने ते बचावले.

शंकर कोंडीबा शिंदे (वय ६३, रा. नऱ्हे आंबेगाव), गुरुदास खंडू लोखरे (वय ४०, रा. हनुमाननगर, पौड फाटा), सुभाष सुरेश भोसले (वय ४५, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे माळवाडी), राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण (वय ४२, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक) अशी मृत्युमुखी पडलेल्या चार कामगारांची नावे आहेत. तर, बसचालक जनार्दन हंबर्डीकर, विश्वास खानविलकर, चंद्रकांत मलजी, प्रवीण निकम, संदीप शिंदे, विश्वास जोरी हे पाच कामगार जखमी असून त्यांच्यावर हिंजवडीतील रूबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोन जण ४० टक्क्यांहून अधिक भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंजवडी माहिती व तंत्रज्ञाननगरीतील टप्पा दोनमध्ये ‘व्योम ग्राफिक्स या नावाने प्रिटींग प्रेस कंपनी आहे. कंपनीचे काम सकाळ आणि दुपार अशा दोन पाळीत चालते. कंपनीतर्फे कामगारांची ने-आण करण्यासाठी बसची सुविधा आहे.