मुख्यमंत्री कार्यालयातून डॉक्टर बोलत असल्याची बतावणी करून एकाने ससून रूग्णालयातील रूग्णांसह कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार २२ ऑगस्ट रोजी घडला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

फिर्यादी ससून रूग्णालयात डॉक्टर असून २२ ऑगस्ट रोजी कामावर होते. त्यावेळी एकाने दूरध्वनी करून मी ‘सीएमओ’मधील डॉक्टर बोलत असल्याची बतावणी केली. त्याशिवाय ससूनमध्ये दाखल रूग्णांच्या नातेवाईकांना लवकर रूग्णवाहिका मिळवून देण्यासाठी ६ हजार ३०० रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

हेही वाचा : पिंपरी: निगडीतील रहिवाशांचे महावितरण कार्यालयात आंदोलन ; वारंवार वीजपुरवठा खंडीत, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल

तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना बदली न करण्यासाठी पैशांची मागणी करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करीत आहेत.