पुणे: गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार, प्रसिद्ध कथा-पटकथा-संवादलेखक व गीतकार क्षितिज पटवर्धन यांना चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा – पिंपरीत चंद्रकांत पाटील यांनी हात का जोडले? वाचा सविस्तर…

हेही वाचा – पुणे : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात गदिमांचे निकटवर्ती स्नेही आणि ज्येष्ठ साहित्यिक-शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. उत्तरार्धात गदिमांचे कनिष्ठ बंधू डॉ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे गदिमा पुरस्कार विजेत्या आशा काळे यांच्या आवडीच्या गदिमा गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी शुक्रवारी दिली. प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि राम कोल्हटकर या वेळी उपस्थित होते.