उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने ससून रुग्णालयाच्या आवारात टोळक्याने गोंधळ घालून वैद्यकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी टोळक्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.याप्रकरणी भुपेंद्र मुरलीधर मोरे (वय ४०, रा. नऱ्हे), शुभम प्रफुल्ल घरवटकर (वय २०, रा. धायरी), दिलीप चाचुर्डे (रा. बुधवार पेठ) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. मयूर सत्यवान सातपुते (वय ३०, रा. भिंताडेनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>पुणे: थकीत वीज देयकावरुन महावितरणच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की; खडकीतील घटना, दोघांच्या विरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाॅ. सातपुते ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. रविवारी मध्यरात्री एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या वेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी उपचार नीट न केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन रुग्णालयाच्या आवरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वैद्यकीय तज्ज्ञांनी शवविच्छेदन करण्यास सांगितले. तेव्हा रुग्णाच्या दोन्ही मुलांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. डाॅ, सातपुते आणि सहकारी डाॅ. श्रीहरी हाळनूर यांना धक्काबुक्की करण्यात आली. आरोपींनी त्यांना धमकावून रुग्णालयाच्या आवरात गोंधळ घातला.