पुणे : शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भवानी पेठेत बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> कॉम्यूटर इंजिनअर तरुणीवर ॲसिड टाकण्याची धमकी, भर रस्त्यात मारहाण; एकास अटक

मिळालेल्या माहितीनुसार, सर्फराज उर्फ डर समीर शेख (वय २३, रा. बाबु मामडी चौक, लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. शेख याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आला होता. मात्र तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करुन तो भवानी पेठेत आल्याची होता.

हेही वाचा >>> मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधवच्या साथीदारांकडून १३ पिस्तुले जप्त, खंडणी प्रकरणात टोळीतील सात जण अटकेत

दरम्यान, डर समीर शेख शहरात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले. यावेळी कारवाईमध्ये पोलिसांनी शेख याच्याकडील देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केले आहे.

हेही वाचा >>> पुणे : वाढदिवसाला टोळक्याची दहशत, कोयते नाचवत वाहनांवर केली दगडफेक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, हवालदार अजय थोरात, अमोल पवार, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, तुषार माळवदकर आदींनी ही कारवाई केली.