पिंपरी- चिंचवड: मालकाने जर्मन शेफर्ड प्रजातीच्या श्वानाच्या गळ्यातील पट्टा निष्काळजीपणे सोडल्याने अल्पवयीन मुलाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. घटनेत अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे. अल्पवयीन मुलाच्या डाव्या पायाला श्वानाने चावा घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील सेक्टर नंबर १२ स्वराज्य नगरी येथे पाळीव जर्मन शेफर्ड प्रजातीच्या श्वानाने अल्पवयीन मुलाला चावा घेतला. ही घटना शनिवारी घडली आहे. सोसायटीच्या आवारात मुलं खेळत होती. त्याच वेळेत मालक पाळीव श्वानाला मुलांच्या दिशेने घेऊन येत होता.
मालकाने निष्काळजीपणाने श्वानाच्या गळ्यातील पट्टा काढला. हे बघून मुलं घाबरली आणि धावायला लागली. पैकी एकाच्या पाठीमागे श्वान लागल्याने अल्पवयीन मुलगा आरडाओरडा करत धावायला लागला.
पिंपरी- चिंचवड : मालकाने जर्मन शेफर्ड प्रजातीच्या श्वानाच्या गळ्यातील पट्टा निष्काळजीपणे सोडल्याने अल्पवयीन मुलाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. pic.twitter.com/YBl84fISLR
— chaitanya sudame (@ChaitanyaSudame) October 19, 2025
श्वानाने पायाला चावा घेतला आणि अल्पवयीन मुलगा खाली पडला. स्वतः चा बचाव करण्यासाठी मुलाने श्वानाला लाथेने मारले. घटनेनंतर सोसायटीमधील नागरिक संतापले होते. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.